मु जे महाविद्यालयात संमोहनतज्ञ डॉ. अनंत तोंडुलकर यांचे व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी) : मु. जे. महाविद्यालयातील विद्यार्थी समुपदेशन समिती व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध संमोहनतज्ञ डॉ. अनंत तोंडुलकर यांचे शिथिलीकरण तंत्र व समायोजन या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर यांनी भुषविले. प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ललिता निकम यांनी केले.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. अनंत तोंडुलकर यांनी शिथिलीकरण तंत्रामुळे मानसिक ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत होते. शिथीलीकरण वाढवलं की समायोजनाची क्षमता वाढते, मन शांत होते, मानसिक लवचिकता येते. निर्णय क्षमता सुधारते, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढते तसेच वैयक्तिक व व्यावसायिक यश वाढते. जीवनाची गुणवत्ता वाढते.
नंतर डॉ. अनंत तोंडुलकर यांनी संमोहन व शिथीलीकरण तंत्राचे प्रशिक्षण दिले अध्यक्षीय भाषणात डॉ. भूपेंद्र केसर यांनी स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी समुपदेशनाद्वारे व शिथीलीकरणाद्वारे समायोजन व ताण , नैराश्य, कसे कमी करू शकतो याचे महत्त्व सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. बालाजी राऊत यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समुपदेशन समिती अध्यक्ष डॉ. ललिता निकम, डॉ. लीना भोळे डॉ. बालाजी राऊत प्रा. सोनाली शर्मा, प्रा. अक्षय खरात यांनी परिश्रम घेतले.




