आरोग्यजळगावताज्या बातम्यासामाजिक

शिबिरात रक्तदात्यांना हेल्मेट वाटप, शिवनेरी ग्रुपतर्फें पंकज पाटील यांचा उपक्रम

शिवकॉलनीत ५५ नागरिकांनी केले रक्तदान

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथील शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात ५५ नागरिकांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. शिबिराचे वैशिष्ट्ये म्हणजे की, प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट वाटप करण्यात आले.

शिवनेरी ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत शिव कॉलनी येथील चांदणी चौकातील मैदानात घेण्यात आले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वाहन चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेट वाटप करण्यात आले.यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी शिबिराला भेट दिली.

प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे आ. भोळे यांनी कौतुक केले. शिबिरामध्ये महिला व मुलींनी देखील रक्तदानासाठी पुढाकार घेतला. यावेळी पंकज पाटील यांनी देखील वाढदिवसानिमित्त रक्तदान करून एक आदर्श घालून दिला. शिबिरासाठी रेड प्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड, अमोल शेलार यांच्या सहकार्यासह शिवनेरी ग्रुप व पंकज पाटील मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button