जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्यशासकीय

जिल्ह्यात एकूण ६५.५८ टक्के मतदान!

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद; निकाल 21 डिसेंबरला

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १८ नगरपालिकांसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ६५.५८ टक्के मतदान झाले आहे. यात नगरसेवकांच्या ४५२ पदांसाठी १५१४ उमेदवारांचे तर नगराध्यक्ष पदासाठी १७ जागांसाठी ७७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. निकाल हा 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून याबाबत नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

जिल्ह्यात सकाळी संथगतीने होणाऱ्या मतदानाला दुपारनंतर वेग आला. तर सायंकाळी अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. अखेरीस जिल्ह्याचा एकूण सरासरी मतदान टक्का ६५.५८ टक्क्यांवर स्थिरावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

रावेरमध्ये एकूण ७४.७४% मतदान
रावेरमध्ये नागरिकांचा मतदानाला सकाळपासूनच मोठा प्रतिसाद पाहायला मिळावा. दिवसभरात रावेरमध्ये एकूण ७४.७४% मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदान भुसावळमध्ये ५४.९१% झाले आहे.

21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम
एकाच टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आधी लागल्यास, त्याचा परिणाम २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो, या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार, आज मतदान झालेल्या आणि २० डिसेंबरला मतदान होणाऱ्या सर्व जागांची मतमोजणी आता एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. तोपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम मशिन्स सील करण्यात आले असून बुधवारी दिवशी निकाल लागणार असल्याने उमेदवारांवरील ताण कमी झाला होता. मात्र, आता निकाल थेट १९ दिवसांनी लागणार असल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

फायनल टक्केवारी
जामनेर – ६०.६८%, भुसावळ – ५४.९१%, यावल – ७३.१६%, फैजपूर – ७२.९१%, पाचोरा – ६८.८२%, वरणगाव – ७२.७१% ,अमळनेर – ६४.४८% , चाळीसगाव – ६२.५८%, सावदा – ६९.९९%, चोपडा – ६७.९७%, भडगाव – ६८.७०%, रावेर – ७४.७४%, धरणगाव – ७२.५४%, पारोळा – ७२.८७%, नशिराबाद – ६८.११%, मुक्ताईनगर – ६४.४४%, शेंदुर्णी – ६९.८९%.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button