
जळगाव (प्रतिनिधी) : येथे जिल्हास्तर फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धेत गोदावरी स्कुलने रोप्य पदक पटकावले. या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल ने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
१४ वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्तम खेळ सादर करून उपविजेतेपद पटकावले व रोप्यपदक आपल्या नावे केले आहे. या संघाला ममता प्रजापत, मयूर पाटील, उदय फालक सरांचे मार्गदर्शन लाभले.या कामगिरीमुळे उत्कृष्ट यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदय रोग तज्ञ डॉ .वैभव पाटील यांनी तसेच स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी, शिक्षकवर्ग व क्रीडा प्रशिक्षकांनी अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




