आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिक

बॉडी कॉम्पोझिशन अ‍ॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांनी करून घेतली तपासणी

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : जागतिक फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॅम्पस, जळगाव खु. येथे आयोजित विशेष बॉडी कॉम्पोझिशन अ‍ॅनालिसिस शिबिरात ३३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

एकाचवेळी अकाउंट ऑफिस, हॉस्पिटल बिल्डिंग रिसेप्शनसमोर व गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व प्रशासकीय विभागातील राहुल गिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात ३३० च्या वर कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत तपासणी करून घेतली.

अत्याधुनिक बॉडी कॉम्पोझिशन उपकरण (कारडा स्कॅन ) च्या मदतीने तपासणी करण्यात आली ज्यामध्ये सहभागींच्या शारीरिक आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शिबिरात स्केलेटल मसल फॅट टक्केवारी, व्हिसेरल मसल फॅट, बॉडी मास इंडेक्स, बेसल मेटाबॉलिक रेट तसेच निरोगी जीवनशैली जपण्यासाठी वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शनही देण्यात आले

या उपक्रमाचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यविषयक मोजमाप व प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करणे हा होता. या शिबिराचे समन्वयक डॉ. आशिष पाटील, डॉ. सचिन व डॉ. ऋतुजा होते. यशस्वीतेसाठी फिजिओथेरपी विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी पुढाकर घेत स्वताची तपासणी करून घेतली व कर्मचाऱ्याना प्रोत्साहीत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button