अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिक

गोदावरी अभियांत्रिकीत डेमो डे, आयडिया शोकेस २०२५ स्पर्धा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे डेमो डे व आयडिया शोकेस २०२५ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. द्वितीय व तृतीय वर्षाच्या विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि मॉडेल्स सादर केली.

यावेळी रिसर्च अँड इनोव्हेशन डीन व आयआयसीचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत इंगळे,अकॅडमिक डीन डॉ. तुषार कोळी,आयआयसी कन्व्हेनर डॉ. अतुल बर्‍हाटे, परीक्षक डॉ. निलेश चौधरी, प्रा. हरीश पाटील, डॉ. विजय चौधरी,प्रा. प्रशांत शिंपी आणि प्रा. वेलचंद होले इ मान्यवर उपस्थीत होते. विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना, संशोधन आणि नवोपक्रमाची भावना निर्माण करणे, प्रत्यक्ष आयुष्यातील समस्यांसाठी तांत्रिक उपाय शोधणे, विद्यार्थ्यांना संधी, व्यासपीठ आणि प्रेरणा उपलब्ध करून देणे या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.डॉ. हेमंत इंगळे यांनी संशोधन क्षेत्रात नवीन पावले उचलून भविष्यातील तांत्रिक क्रांतीत योगदान देण्याचे आवाहन केले. डॉ. तुषार कोळी यांनी नवीन कल्पना, संशोधन, आंतरशाखीय शिक्षण आणि तांत्रिक कौशल्य या घटकांचे महत्त्व अधोरेखित केले.विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक मॉडेल्स, प्रोटोटाईप्स आणि कल्पना सादर केल्यात. प्रकल्पांचे परीक्षण डॉ. निलेश चौधरी, प्रा. हरीश पाटील, डॉ. विजय चौधरी,प्रा. प्रशांत शिंपी आणि प्रा. वेलचंद होले यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन आयआयसी कन्व्हेनर डॉ. अतुल बर्‍हाटे व प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.सुत्रसंचालन विद्यार्थिनी श्वेता बोरसे व दिपाली सुरोसे यांनी केले.

असा आहे निकाल
1. संगणक अभियांत्रिकी विभाग मेडबोट – एआय मेडिकल असिस्टंट डिंकी शदाणी, प्रेम बोरसे,हर्षदा वारुळे यश महाजन प्रथम फिनिक्स गौरव कापळे , वरुण पाटील, वेदांत विसपुते व्दीतीय
2. एआय आणि डी एस अभियांत्रिकी विभाग एआय बेस फार्मर क्युरी सपोर्ट आणि डव्हायझरी सिस्टीम पूर्वा चौधरी,प्रशांत धनगर,समृद्धी घिनमिने,मयूर गुरव
3. इ अँन्ड टीसी अभियांत्रिकी विभाग १) ऑटोमॅटिक क्लॉथ ड्रायर सिस्टीम खुशबू पिसाळकर, प्राजक्ता पाटील, भावेश काकोटे
4. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग १) इलेक्ट्रिक व्हि२व्हि चार्जिंग सिस्टीम महेश नारखेडे, जीवेश अत्तरदे, खगेश नारखेडे, सारंग पाटील, महाविद्यालय प्रशासनाने सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही संशोधन आणि नवोपक्रमासाठी प्रोत्साहन दिले.

स्पर्धेच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button