मुक्ताईनगर तालुक्यात शेतातून तब्बल २३ लाखांचा गांजा जप्त!

जळगाव पोलीस दलाची मोठी कारवाई ; एकास अटक
जळगाव (प्रतिनिधी) : मानेगाव, ता. मुक्ताईनगर येथे स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव आणि मुक्ताईनगर पोलिसांनी दि.१९ नोव्हेंबर रोजी संयुक्तरीत्या कारवाई करत शेतात केलेली गांजाची मोठी अवैध लागवड उध्वस्त केली आहे. या कारवाईत मनोज नामदेव घटे (वय ४०, रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्या शेतातून गांजाची हिरवी झाडे: ५१ नग, एकूण वजन: ३४१ किलो ५०० ग्रॅम (३ क्विंटल ४१ किलो ५०० ग्रॅम) असा एकूण ₹ २३,२२,२००/- मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात NDPS Act अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही करवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, चालक पोकॉ भरत पाटील यांच्यासह मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, सपानि जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी, पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, पोना मोतीलाल बोरसे, पोकॉ चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन या पथकाने केली




