आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “उर्जयती-२०२५” : दिग्गज उद्योजकांचा संवाद व नवउद्योजकतेला नवी उर्जा

एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत ५ दिवसांचे वर्कशॉप अ‍ॅन्ड बूट कॅम्प

जळगाव (प्रतिनिधी) : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कौन्सिल सेलतर्फे “ऊर्जयती-२०२५” या शीर्षकाखाली इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम दि.१३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला. या पाच दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात कोगटा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रेम कोगटा, विनले पॉलिमर्सचे संचालक पोरस संचेती, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. तन्मय भाले व प्रा. डॉ. विशाल राणा हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी “उर्जयती-२०२५” या कार्यशाळेचे उद्देश, रूपरेषा आणि या उपक्रमामागील व्यापक दृष्टीकोन विद्यार्थ्यांसमोर उलगडला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कोगटा ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रेम कोगटा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या एंटरप्रेनरशिप जर्नी बद्दल सांगत महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ग्राहकांना फॅमिली मेंबर्सप्रमाणे वागवल्यास व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी राहतो. मार्केट रिसर्च, ग्राहकसंबंध व्यवस्थापन आणि क्वालिटी मॅनेजमेंट यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर विनले पॉलिमर्सचे संचालक पोरस संचेती यांनी “टेक्नॉलॉजी इन फॅमिली मॅनेज्ड बिझनेस” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कंपनीने विविध आव्हानांना संधींत कसे रूपांतरित केले याची उदाहरणे मांडली. दुसऱ्या दिवशी, वसंत सुपरशॉपीचे संचालक नितीन रैदासानी यांनी विद्यार्थ्यांना “व्हॅल्यूज अँड एथिक्स इन बिझनेस” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.

यानंतर चार्टर्ड अकाउंटंट प्रीती मंडोरे यांनी मार्गदर्शन करताना कुटुंबीय व्यवसायात महिलांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते हे अधोरेखित केले.

१६ रोजी एपेक्स स्टार्टअप ग्रुपचे संस्थापक अजिंक्य तोतला यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या “एपेक्स स्टार्टअप ग्रुप” बद्दल सविस्तर माहिती दिली. हा ग्रुप नवउद्योजकांना कशाप्रकारे मदत करतो, कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन व कौन्सिलिंग करतो याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यानंतर अर्बन क्लॅडचे संस्थापक आणि रायसोनी महाविध्यालयाचे माजी विद्यार्थी अंकुर साळुंखे यांनी सांगितले की, महाविद्यालयातील अनुभवामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत मोठी मदत झाली. त्यांनी पुढे स्वतःचा व्यवसाय कसा सुरू केला, उद्योग क्षेत्रातील त्यांचे कार्य कसे वाढले आणि स्टार्टअप प्रवासात महाविद्यालयाकडून कोणते मार्गदर्शन व सहकार्य मिळाले याची माहिती दिली. अखेरच्या सत्रात अ‍ॅस्पिरेया कन्सल्टिंगचे संस्थापक आणि रायसोनी महावीध्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज वानखडे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून त्यांना योग्य दिशादर्शक मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. तन्मय भाले यांनी संपूर्ण आयोजन प्रभावीपणे पार पाडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे आणि प्रा. श्रिया कोगटा यांनी उत्तमरीत्या सांभाळले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी सर्वांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून अधिकाधिक व्यावहारिक ज्ञान घेण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button