रोटरी क्लब जळगावतर्फे वैद्यकीय शिबिरात ७०० रुग्णांची तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे चोपडा तालुक्यातील धानोरा येथे मोफत रोगनिदान व उपचार शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरसीसी क्लब ऑफ धानोरा यांच्या सहकार्याने भरविण्यात आलेल्या या शिबिरात पंचक्रोशीतून सुमारे ७०० हून अधिक गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, मेडिकल कमिटी चेअरमन डाॅ. जयंत जहागिरदार व प्रकल्प को-चेअरमन डाॅ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात शिबीराचे नियोजन करण्यात आले होते. शिबिरास ज्येष्ठ सदस्य प्रेम कोगटा, किशोर मंडोरा, योगेश गांधी, संदीप शर्मा, ॲड. हेमंत भंगाळे, विजय जोशी, संध्या महाजन, किशोर जाखेटीया, सुबोध सराफ, आरसीसी अध्यक्ष प्रदीप महाजन, सचिव वासुदेव महाजन, प्रमोद झवर, संदीप महाजन, योगेश पाटील, शेखर पाटील, मिलिंद बडगुजर, रेखा महाजन यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या प्रास्ताविकात अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी गावातील सामाजिक योगदानाचा उल्लेख करुन दरवर्षी गावातील गरजूंसाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून हे शिबिर घेतल्याचे स्पष्ट केले. पंचक्रोशीतील बिडगाव, मोहरद,चिंचोली,देवगाव, पारगाव, पंचकसह धानोरा परिसरातून आलेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले. औषधींसह, गरजूंना विनामूल्य चष्मे देण्यात आले. मोफत तपासणी आणि उपचार मिळाल्याने रुग्णांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. उपस्थित डॉक्टरांनीही उत्साहाने सेवा देत शिबिर यशस्वी केले.
जनरल तपासणी डाॅ. उदय चौधरी, डाॅ. पराग जहागिरदार, डाॅ. लिना बडगुजर, डाॅ. प्रांजली जयस्वाल, डाॅ. अंजली नेवे यांनी तर डोळे तपासणी डाॅ. तुषार फिरके, डाॅ. काजल फिरके, डाॅ. निकुंज गुजराथी, डाॅ. अनुपम सिंग, डाॅ. मृणाल पाटील, डाॅ. भाग्यश्री साळवी, डाॅ. गौरव , दामोदर चौधरी, लक्ष्मण जोशी यांनी तर बालरोगतज्ज्ञ डाॅ. नेहा काबरा व महिलांची कर्करोग तपासणी डाॅ. साधना पाटील व डाॅ. चेतना राणे यांनी व दातांची तपासणी डाॅ. रोहन बोरोले यांनी केली.
नोंदणीचे काम रोटरी सदस्य रितेश जैन, विश्वजित बऱ्हाटे, कमलेश चांदवाणी, निपुण बजाज यांनी केले. औषधी व्यवस्थापन जयेश जोशी यांनी केले. शाम अग्रवाल, राकेश चव्हाण, उल्हास सुतार, मच्छिंद्र महाजन, दिगंबर सोनवणे, नंदुलाल महाजन, उमाकांत पाटील, गणेश, गौतम पाटील, अभय महाजन, इशांत पाटील यासह इंटरॅक्ट क्लब सदस्यांनी सहकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि आरसीसी क्लब व इंटरॅक्ट क्लब यांच्या पुढाकारामुळे शिबिर यशस्वी ठरले.




