
पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात १६ नोव्हेंबर रोजी चैतन्य साधक परिवाराचे आध्यत्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या आत्मसाक्षात्कार प्रकाश पर्वा निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आले.
१६ नोव्हेंबर १९९५ रोजी परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांना साधना काळात परम पिता परमेश्वर योगेश्वर भगवान श्री कृष्ण यांचे ज्योतिस्वरूप दर्शन श्री वृंदावन धाम पाल आश्रमात घडले होते. तेव्हापासून आजपर्यंत ३० वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने पाल आश्रमातील श्री हरिधाम मंदिरात स्थित पूज्य बापुजींच्या समाधी स्थळी १६ रोजी सायकाळी सात वाजेला विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यान, प्रार्थना, गीतेचे पठण, श्रद्धावचन, मान्यवरांचे मनोगत तसेच महाआरती करून आश्रम परिसरात हजारो दीपक प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा करण्यात आले. यावेळी आश्रमातील संत ब्रम्हचारी सहित शेकडो चैतन्य साधक परिवार उपस्थित होते.




