अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिकसामाजिक

माहेश्वरी समाजातील शिक्षित-उच्चशिक्षित विवाह योग्‍य युवक-युवतींचे २० डिसेंबर रोजी ऑनलाइन परिचय संमेलन

समितीच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीची सर्वसाधारण बैठक रविवार, १६ नोव्हेंबर रोजी आनंद नगर हॉल, जळगाव येथे अध्यक्ष मनीष झवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मंचावर सचिव डॉ.जगदीश लढ्ढा, कोषाध्यक्ष विवेकानंद सोनी, सहकोषाध्यक्ष वासुदेव बेहेडे, सहसचिव तेजस देपुरा उपस्थित होते.

बैठकीपूर्वी मयत समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील मिटिंगचा इतिवृत्तांत सचिव डॉ.जगदीश लढ्ढा यांनी मीटिंगमध्ये वाचून दाखवला.

दि.२० डिसेंबर २०२५ रोजी माहेश्वरी समाजाच्या शिक्षित-उच्चशिक्षित विवाह योग्‍य युवक-युवतींचा ३२ वा ऑनलाइन परिचय संमेलन जळगाव येथे घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.

प्रकल्प प्रमुख प्रा.संजय दहाड, प्रकल्प समन्वयक तेजस देपुरा, सहप्रकल्प प्रमुख दिपक कासट, प्रशांत बियाणी, मणकचंद झवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संमेलनाचे वैशिष्ट्ये असे :-

  • परिचय संमेलनासाठी रजिस्ट्रेशन केले की वर्षभरातील तीन परिचय संमेलनात सहभाग घेता येईल व ३१ मे २०२६ पर्यंत माहेश्वरी विवाह सहयोग ॲप विनामूल्य उपयोग करता येईल.
  • युवक-युवती आणि त्यांच्या परिजनांची आपसी ऑनलाईन मीटिंग व मंत्रणाची व्यवस्था.
  • माहेश्वरी विवाह सहयोग ॲप मध्ये आपल्या आवडी नुसार विवाह योग्य युवक-युवतींचे बायोडाटा, विडिओ search/sort करून बघता येतात.

खामगावच्या श्री महेश सेवा समितीचे पदाधिकारी नंदकिशोर चांडक, निलेश भैय्या, जगदीश नावंदर, जितेंद्र झवर, कृष्णकांत भट्टड बैठकीत उपस्थित होते. त्यांनी जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समिती तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या परिचय संमेलनांची माहिती घेतली व खामगाव येथे होणाऱ्या परिचय संमेलनाची माहिती बैठकीत दिली.

विविध समित्यांचे गठण
बैठकीत सुभाष जाखेटे, सुरजमल सोमाणी, एड.राहुल झवर, गिरीश झवर, योगेश कासट, हर्षल जाखेटे, सुनील कासट, अजय दहाड, विनोद मुंदडा, एड.राजेंद्र माहेश्वरी, राधेश्याम बजाज, योगेश मंडोरा, चेतन दहाड, शिवनारायण तोष्णीवाल, नरेंद्र काबरा, राधेश्याम सोमाणी, कैलास मुंदडा, राजेंद्र काबरा, वासंती बेहेडे, कमला जाखेटे, भारती झवर, राजश्री लढ्ढा, सायली झवर, नम्रता कासट, रेश्मा जाखेटे, सपना दहाड, शीतल कासट, जया झवर, सारिका मंडोरा, राखी बेहेडे, अर्चना नवाल व मोठ्या संख्येने समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते व विविध समित्यांचे गठण करण्यात आले.

परिचय संमेलनाचे आयोजन चांगल्यात चांगले कसे करता येईल या विषयात सदस्यांनी आपले विचार बैठकीत मांडले. आभार तेजस देपुरा यांनी मानले. राष्ट्रगीतच्या उपरांत बैठक समाप्तीची घोषणा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button