अभिवादनजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारशैक्षणिक

मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर शाळेची IIT BOMBAY मध्ये उल्लेखनीय कामगिरी!

विध्यार्थ्यानी बनविला “CarbonCore Pencils” हा अभिनव आणि पर्यावरणपूरक प्रोजेक्ट

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील सर्वप्रथमच मॅक्रो व्हिजन अकॅडमी एक मात्र अशी शाळा आहे की येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक प्रोजेक्टद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रोजेक्ट Macmillan Budding Scientist 2025-2 026 साठी सादर करण्यात आला. त्याच्या वापर पर्यावरण पूरक व संरक्षणात नक्कीच मदत करणारा आहे.

प्रोजेक्टसाठी रोमित देवेंद्र महाजन आणि आराध्य मिलिंद पाटील या विध्यार्थ्यांना शाळेचे व्यवस्थापक किरण अरुण दुबे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. पर्यावरण विज्ञान या विभागातील “CarbonCore Pencils” हा अभिनव आणि पर्यावरणपूरक प्रोजेक्ट IIT Bombay येथील संपूर्ण भारतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाचे हे उत्कृष्ट फळ आहे.

या निवडीमुळे रोमित आणि आराध्याला देशातील सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट्ससोबत आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. शाळेसाठी, पालकांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांच्यासह शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी तसेच शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button