शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

निरोगी जीवनासाठी टिप्स देऊन मुलांना वाटला खाऊ
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा विभागामध्ये शुक्रवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त उपचारासाठी आलेल्या रुग्ण मुलांसोबत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना उपचार घेताना तणावरहित वाटावे हा हेतू होता.
बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, सहयोगी प्रा. डॉ.योगिता बावस्कर, अधिसेविका संगीता शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी गमतीजमती सांगून वातावरणात चैतन्य निर्माण केले. यानंतर मुलांचे आरोग्य निरोगी कसे राखावे याबाबत मुलांना व त्यांच्या पालकांना डॉ. योगिता बावस्कर यांनी माहिती दिली.
उपक्रमाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी कौतुक केले. प्रसंगी मुलांना खाऊ वाटप करून त्यांना निरोगी आयुष्याच्या सदिच्छा डॉक्टरांनी दिल्या. या वेळेला सूत्रसंचालन डॉ. रितेश पांडे यांनी केले. यावेळी सहाय्यक अधिसेवक तुषार पाटील, वार्ड क्रमांक १६ चे इन्चार्ज परिचारक अक्षय सपकाळ, अधिकारी, परिचारिका डॉक्टर्स, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गिरीश राणे, डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. भावना पाटील, डॉ. हसनैन देशमुख, डॉ. रितेश पांडे, डॉ. शुभम चव्हाण, डॉ. महेश पाटील, डॉ. पवन रेड्डी, डॉ. कृतिका पांडे, डॉ. रियुल लुसबो आदींनी परिश्रम घेतले.




