आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक

स्व. डॉ. उल्हास कडूसकर यांच्या स्मरणार्थ वैद्यक सेवेसाठी प्रेरणादायी कार्य

ऑपरेशन थिएटरसाठी विविध वैद्यकीय उपकरणे दिली भेट

जळगाव (प्रतिनिधी) : खानदेशातील स्त्रीरोग तज्ञांचे मार्गदर्शक, अनेकांना वैद्यकीय क्षेत्रातील मूल्यांची जाणीव करून देणारे आणि आपल्या ज्ञानातून असंख्य रुग्णांना नव जिवन देणारे स्वर्गीय डॉ. उल्हास कडूसकर हे नाव आजही जळगावकरांच्या मनात आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याचा तोच वारसा जपत त्यांच्या धर्मपत्नी डॉ. ज्योती कडूसकर यांनी एक अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

डॉ. उल्हास यांच्या पवित्र स्मृतींना सन्मान देत त्यांनी ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक असलेली विविध वैद्यकीय उपकरणे – डिलिव्हरी टेबल, साईड ट्रॉली, वॉर्मर आणि इतर शस्त्रक्रियेसाठी उपयोगी उपकरणे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांना भेट स्वरूपात अर्पण केली आहेत.

या दानाच्या माध्यमातून केवळ उपकरणांचा हस्तांतरण नव्हे, तर एका डॉक्टरच्या मानवी सेवेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयातर्फे डॉ. प्रशांत वारके यांनी ही उपकरणे औपचारिकरित्या स्वीकारली. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे मार्केटिंग अधिकारी रतन जैन, महादेव हॉस्पिटलचे चंद्रकांत डोंगरे, मयूर पाटील, कुंदन भंगाळे, गोपाळ पाटील, प्रफुल भोळे, मयूर चौधरी तसेच डॉ. कडूसकर हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी व्यक्त केले की, “स्व. डॉ. उल्हास कडूसकर हे केवळ उत्तम डॉक्टर नव्हते, तर एक संवेदनशील आणि मानवतेशी निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतीत केलेले हे दान म्हणजे त्यांच्याच सेवाभावाचा जिवंत संदेश आहे.” या उपक्रमामुळे अनेक तरुण डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव व सेवेचा आदर्श मिळाला आहे. स्व. डॉ. उल्हास कडूसकर यांच्या कार्याचा सुगंध अशा प्रेरणादायी कृतींमुळे दीर्घकाळ समाजात दरवळत राहील, हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button