जळगाव शहरात रात्री पोलिसांचे विशेष मोहिम ऑपरेशन

संशयास्पद हालचाली करणाऱ्या २७ जणांवर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जळगाव शहरात दि.११ रोजी रात्री ८.३० वा ते दि.१२ रोजी ००.३० वाजेपावेतो विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन व जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या सुमारे २७ जणांवर कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, कासमवाडी, तुकारामवाडी, तांबापुरा, कंजरवाडा इत्यादी ठिकाणी विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात ७ इसमांवर बि.पी अॅक्ट ११२/११७ प्रमाणे कारवाया करण्यात आलेल्या आहे. तसेच जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत कांचननगर, विठ्ठलपेट, डॉ. आंबेडकर नगर, गोपाळपुरा, कोळीपेठ, मेस्कोमातानगर, गुरुनानक नगर, शनिपेठ गवळीवाडा, ज्ञानदेव नगर, दाळफळ, तळेले कॉलनी, शंकर अप्पा नगर इत्यादी ठिकाणी विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात १४ इसमांवर मुंबई पोलीस अॅक्ट १२२ प्रमाणे कारवाया करण्यात आलेल्या असून २ इसमांवर मोटार वाहन अधिनियम अन्वये कारवाया करण्यात आलेल्या आहे. तसेच २ इसमांवर बि.पी अॅक्ट ११२/११७प्रमाणे कारवाया करण्यात आलेल्या आहे.
अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई
जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर, गेंदालाल मिल, राजमालती नगर, शाहुनगर इत्यादी ठिकाणी विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात एस. के. ऑईल मिल समोर भिंतीलगत एक इसम देशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून ९० ml मापाच्या १४ बाटल्या ५६० रू दराच्या जप्त करून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जळगांव दुधफेडरेशन मिथीला अपार्टमेंट खाली विकास बियर शॉपीमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून १६४६५ रू दराच्या देशी विदेशी एकूण १६९ बाटल्या जप्त करून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोटपा सदरता १ इसमांवर कारवाई केली असून त्याबाबत २०० रू दंड वसूल करण्यात आलेला आहे.
विशेष मोहीम राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सुचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक जळगांव यांनी स्वतः व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंमलदार, क्यूआरटी पथक, आरसीपी पथक घेऊन केली आहे. यापुढे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हयांत अचानक विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.




