
पाळधी – तरसोददरम्यान दोघं ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : दगडी कोळसा भरलेला ट्रकने समोरून येणाऱ्या टाइल्स असलेल्या ट्रक जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात समोरासमोर एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी नवीन राष्ट्रीय महामार्गावर पाळधी ते तरसोद गावादरम्यान घडली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. या अपघातात दोन्ही ट्रकांचे मोठे नुकसान झालेले असून जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या मृत चालकाचा मृतदेह काढण्यात आला. या अपघातात क्लीनर थोडक्यात बचावला असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.




