
मेहरुणला संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हरिनाम किर्तन
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळानिमित्त पहिल्या दिवशी ह.भ.प. ज्योतीताई यांनी मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना धर्म शिकवा सोबत मोबाईलचे दुषपरिणाम यावर जनजागृती केली. मेहरुण परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.
माउलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा असून, दि.१७ रोजी दुपारी १२ ते ३ महाप्रसाद दुपारी ४ ते संध्याकाळी ७.३० या वेळेत दिंडी सोहळा होणार आहे. रात्री ८ ते ११ या वेळेत परंपरेप्रमाणे ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
दैनिक हरिनाम किर्तनात गायक ह.भ.प. कैलास महाराज, अंजदे ह.भ.प. अविनाश महाराज, गायनाचार्य, मृदुंगांचार्य : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, राजुर पेटी वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, ह भ प विशाल महाराज जळगावकर, अंभई विणेकरी : भास्कर महाजन, अशोक देवरे, मेहरूण टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. या हरिनाम किर्तनाचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.




