वंदे मातरम् शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त शहरात मोटरसायकल रॅली

जळगाव (प्रतिनिधी) : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत म्हणजे राष्ट्रभक्तीची जाज्ज्वल्य गर्जना असून या गीताला १५० वर्ष पूर्ण झाली आहे. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव संपूर्ण देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आहे.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोदावरी मेडिकल कॉलेज साकेगाव भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. भव्य मोटरसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून सुरुवात करण्यात आली. तर या रॅलीचे समारोप गोदावरी मेडिकल कॉलेज, साकेगाव येथे वंदे मातरम् गीताचा सामूहिक गीत गायन करून संपन्न झाली.
यांनी नोंदविला सहभाग
मोटरसायकल रॅलीप्रसंगी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारतीताई सोनवणे, वंदे मातरम् @१५० जयंती समारोह जिल्हा समिती संयोजक राहुल वाघ, शक्ती महाजन, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी पलांडे, माजी महापौर सीमाताई भोळे, महिला मोर्चा प्रमुख नितुताई परदेशी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, रेखा वर्मा, नंदिनी दर्जी, वंदना पाटील, भूषण लाडवंजारी, दिपक परदेशी, सागर पाटील, राहुल पाटील, संतोष इंगळे, आशिष सपकाळे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, विनोद मराठे, दीपमाला काळे, अजित राणे, अतुल बारी, यांच्यासह माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, भगत बालाणी, प्रकाश बालानी, प्रमोद वाणी, शिरीष तायडे, नितीन लड्डा, सुनील महाजन, युवा मोर्चा पदाधिकारी रोहित सोनवणे, आकाश मोरे, स्वप्नील चौधरी, हितेश राजपूत, सतनामसिंग बावरी, सुनील भारंबे प्रकाश पंडित,अक्षय चौधरी, संदीप तेले, महेश कापुरे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.




