आरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक
रोटरी मिडटाऊनतर्फे सात व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन व एस.डी. इव्हेंट्स यांच्यातर्फे विविध क्षेत्रातील सात मान्यवर व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.
गंधे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते योगेश बिर्ला, रितेश माळी, रत्नाकर पाटील, धनश्री ठाकरे, मनोज व्ही. पाटील, डॉ.राहुल पाटील ॲड. शैलेंद्र घारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे मानव संसाधन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट सी.एस.नाईक, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. किशोर बी. पाटील, मानद सचिव डी.ओ.चौधरी, एस.डी. इव्हेंट्सचे संचालक दिनेश थोरात, ॲड. उज्वला पाटील, माधुरी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.




