
स्वामी प्री-प्रायमरी, समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचा उपक्रम
रावेर, (प्रतिनिधी) : येथील स्वामी प्री-प्रायमरी आणि समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांचे पूजन केले. प्रारंभी प.पु.लक्ष्मण चैतन्य बापु (पाल, आश्रम) व स्वामी विवेकानंद, सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांनी केले.
यावेळी प्रत्येक वर्गातील एक -दोन विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेविषयी भाषणे सादर तर काही विद्यार्थ्यांनी गाणी सादर केली. जॉन्सी थॉमस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वामी शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार व सचिव मनिषा पवार यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना स्वतः बनवलेली ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट दिले आणि विभाग प्रमुख यांनी सर्व शिक्षकांना गिफ्ट दिले. सर्व शिक्षकांनी विभाग प्रमुखांना गिफ्ट दिले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.