स्तनांच्या कर्करोगाबद्दल जळगावात उद्या पिंक वॉकचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत आकाशवाणी चौकापासून भाऊंच्या उद्यानापर्यंत पिंक वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव, आयएमए वुमन डॉक्टर्स विंग आणि जळगाव ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये कर्करोगा विषयी वेळेवर तपासणी व लवकर निदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांचे आरोग्य जपणे हा या रॅलीचा उद्देश असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
सहभागाच्या उपस्थिती विषयी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले, वुमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. हर्षिता नाहटा, सचिव डॉ.नीलम पाटील, जेओजीएसच्या अध्यक्ष डॉ. वैशाली चौधरी, सचिव डॉ. अनिता बाविस्कर आणि डॉ. निलेश चांडक यांनी आवाहन केले आहे.




