अभिवादनजळगावताज्या बातम्याधार्मिकशैक्षणिक

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण लीलावर आधारित सुंदर नाटिका व नृत्य सादर केले, तर विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवन व शिकवणीवर आधारित मनमोहक नृत्ये सादर केली.

अनेक विद्यार्थी कृष्ण, राधा व गोपांच्या वेशभूषेत आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक रंग प्राप्त झाला. जन्माष्टमी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया शर्मा यांनी केले. तर अनुष्का चौधरी यांनी भावपूर्ण भाषण दिले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी महान राष्ट्रनिर्मात्यांच्या तसेच विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले. त्यांनी देशभक्तीपर घोषणा व प्रेरणादायी संदेश देऊन वातावरण भारावून टाकले. विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी योग सादरीकरण, जीवांश पटेल यांची देशभक्तीपर कविता आणि देशभक्तीपर गीत सादर केले. अयान जगवानी आणि अगम नाहर यांनी वंदे मातरम् ची धून कॅसिओवर वाजवून कार्यक्रमाला एक मधुर व प्रेरणादायी स्पर्श दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्ना मोए यांनी केले. प्राचार्य मनोज परमार यांनी व्यवस्थापन व अध्यक्ष अतुल जैन, शिक्षकवर्ग, हाऊसकीपिंग कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि वाहतूक विभागाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. अनुभूती स्कूल चे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, अंबिका जैन यांनी सर्व पालक, विद्यार्थी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्य दिनाची शपथ घेण्यात आली, ज्यामध्ये सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, संगोपन व प्रेरणा देऊन त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याचा आणि देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button