
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात ग्रंथालय सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयात दि १९ व २० रोजी ग्रंथालय सप्ताह निमित्त दोन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दि १९ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी येथील क..ब.ज.ऊ प्रा. सागर अक्ष्रवाल कृत्रिम बुध्दीमत्ताचा शिक्षणात उपयोग तर दि. २० रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. वाचन का व कशासाठी करावे तसेच वाचनाचे फायदे भविष्यात कसे उपयोगी पडतील हे समजावून सांगितले.
विद्यार्थी दशेत असताना वाचनाने एकाग्रता वाढते असे त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. कविता राहुल भोरटके यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास शिक्षक वृंद तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




