जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्य

रावेरला महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक उत्साहात

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती संदर्भात 1 नोव्हेंबर रोजी बैठक पार पाडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

बैठकीदरम्यान, सखोल चर्चा होऊन उपक्षांच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडी एकसंघपणे आगामी निवडणुकांना समोरे जाईल, असे निश्चित करण्यात आले. तिघं पक्षांची शहर परिसरातील प्राथमिक चाचपणी पूर्ण झालेली असून, लवकरात लवर एक उचीत अशी रणनीती ठरवून महाविकास आघाडी येणाऱ्या आगामी निवडणुका लढविणार, असे सर्वांनुमते ठरविण्यात आले.

तसेच रावेर नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रत्येक प्रभागांतून नगरसेवक पदासाठी सक्षम उमेदवार देण्याचे निश्चित झालेले आहे. लवकरच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांची बैठक घेतली जाईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे धनंजय चौधरी, शिवसेनेचे प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादीचे रमेश महाजन, सोपान पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र पवार, अशोक शिंदे, डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे किशोर पाटील, शिवसेनेचे योगीराज पाटील, राष्ट्रवादीचे नितीन पाटील, महेमूद शेख, शिवसेनेचे नितीन महाजन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button