मायक्रो ओबीसी कारागीर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी ओबीसी किसान नेत्यांची चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर येथे आज सकाळी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर निवासस्थानी ओबीसी मायक्रो ओबीसी १२ बलुतेदार कारागीर शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना रावेर तालुक्यात होणाऱ्या भव्य राज्यव्यापी मेळाव्याचे आमंत्रणही देण्यात आले.
यावेळी ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर, जळगाव जिल्हा नेते सुरेश ठाकरे महाराज, संजय चौधरी, राज युवराज ठाकरे यांच्यसह असंख्य कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. दिवाळीनंतर महत्वपूर्ण समस्यांचा संदर्भात बैठका लावणार असल्याचे, आश्वासन मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
या मेळावा सर्व स्तरातील सर्वपक्षीय त्यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे ओबीसी समाजाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळावा देणार असल्याचे प्रशांत बोरकर यांनी यावेळी सांगितले.




