आरोग्यआर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसमस्या

शिरपूर बायपास रोडवर लुटीची तयारी करणारी टोळी जेरबंद!

चोपडा पोलिसांच्या कारवाईत पिस्तुलं, तलवारी, मॅगझीनसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा शहरात रविवारच्या मध्यरात्री शिरपूर बायपास रोडवर लुटीची तयारी करणाऱ्या सात धोकादायक आरोपींना चोपडा शहर पोलिसांनी धाडसी कारवाईत जेरबंद केले. या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुलं, तलवारी, मॅगझीन, मोबाईल फोन आणि चारचाकी वाहन असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वी खून, दरोडा, खंडणीवसुली आणि दहशत माजवण्याचे गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरामध्ये शिरपुर बायपास रोडवर एका पांढ-या रंगाच्या गाडीमध्ये काही संशयीत व्यक्ती बराच वेळ थांबलेले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०२-३० वा. चे सुमारास गोपनीय बातमी मिळाली. त्या अनुषंगाने तात्काळ पोलीस पथक तयार करून संशयीत गाडीचा शोध घेतला. रणगाडा चौकाच्या थोडे पुढे, शिरपुर बायपास रोडच्या बाजुला पांढऱ्या रंगाची स्विप्ट डिझगायर चारचाकीकार (क्र.MH २६ CH १७३३) ही थांबलेली होती. या गाडीच्या बाहेर दोघेजण लक्ष ठेवुन उभे असलेले व पाच जण आतमध्ये बसलेले असे एकुण सात संशयीत जण मिळुन आले.

पोलीसांना पाहुन त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस पथकाने तात्काळ घेराव घालुन सातही जणांना पकडले. त्यांच्या कारची झडती घेतली असता दोन इसमांच्या कंबरेला लोडकरण्यात आलेले गावठी कट्टे मिळुन आले. त्याचप्रमाणेगाडीमध्ये दोन तलवारी तसेच एक रिकामे मॅगझीन मिळुन आली. या कारवाईत दिलीपसिंघ हरीसिंध पवार (वय ३२ वर्ष रा. प्लाट नं. ४२१ नाथनगर, नांदेड ता.जि. नांदेड), विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४ वर्षे रा. येवलारोड, विरभद्र मंदीरा जवळ वैजापुर ता. वैजापुर जि. संभाजीनगर), अनिकेत बालाजी सुर्यवशी (वय २५ वर्षे रा. नवामोंढा, गणेश मंदीर जवळ नांदेड ता.जि. नांदेड), अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (वय २५ वर्षे रा. मगनपुरा नांदेड ता.जि. नांदेड), सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (वय ३३ वर्षे रा. इतवारा मेस्को रोड, नांदेड ता.जि. नांदेड), अक्षय रविंद्र महाले (वय ३० वर्षे रा. भावसार गल्ली चोपडा ता. चोपडा), जयेश राजेंद्र महाजन (वय ३० वर्ष रा. भाटगल्ली चोपडा) यांना ताब्यात घेतले.

खून, दरोडा, खंडणीवसुलीसह दहशत माजवण्याचे गंभीर गुन्हे दाखल

संशयीतांबाबत अधिक चौकशीकेली असता ते नामचीन गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, अग्निशस्त्रे व तलवार, चॉपर बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे नांदेड, वैजापुर जि संभाजीनगर तसेच चोपडा येथे यापूर्वी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे गुन्हेगार अतिशय धोकादायक असुनत्यापैकी दोन आरोपीहे महाराष्ट्र धोकादायककृत्यांना प्रतिबंध अधिनियम (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबध्दतेमधुन नुकतेचकारागृहातुन बाहेर आलेले आहेत. एक आरोपी वैजापुर, जि संभाजीनगर येथील दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आहे. चोपडा येथील एका आरोपीवर पुर्वी अग्निशस्त्र बाळगल्याबाबत तसेच दंगल केल्याबाबत गुन्हे नोंद आहेत.

१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सदरचे सर्व ७ आरोपी हे संगनमताने रस्तालुट व दरोड्याचीतयारीकरून सशस्त्र स्थितीत एकत्र जमल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरूध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मिळुन आलेले गावठी पिस्टल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम, चारचाकीगाडी असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीतांना रिमांडकामी न्यायालयात हजरकरण्यात येत आहे. आरोपीतांबाबत केलेल्या तपासामध्ये दिसुन आले आहे की, नांदेड येथेसदर आरोपीतांची अतिशय दहशत असुन लोकांना शस्त्रांचा धाक दाखवुन खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरणकरणे, विवस्त्र करून लोकांचा छळकरणे व त्याचे व्हिडीओ तयार करून ते इतर लोकांना दाखवुन त्यांना घाबरवणे असे कृत्ये करत असल्याचे दिसुन येत आहे. त्याबाबत सखोल तपास चालु आहे.

यांनी केली कारवाई


ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकॉ हर्षल पाटील, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, पोकों अजिंक्य माळी, पोकॉ अमोल पवार, पोकॉ मदन पावरा, पोकॉ रविंद्र मेढे, पोकों विनोद पाटील, चालक पोहेकॉ किरण धनगर, पोकों योगेश पाटील, पोकॉ प्रकाश ठाकरे यांनी पार पाडली. गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button