‘चमत्कारा मागील विज्ञान आणि प्रबोधन सप्रयोग’ वर मिथुन ढिवरे यांचा कार्यक्रम

हेमंत क्लासेस दरवर्षी राबवित सात दिवसांचा ‘ज्ञानोत्सव सप्ताह’
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा जळगाव च्यावतीने हेमंत क्लासेस, महाबळ येथे ज्ञानोत्सव या कार्यक्रमांतर्गत सप्रयोग चमत्कार सादरीकरण, चमत्कारामागील विज्ञान आणि प्रबोधन या विषयावर मिथुन ढिवरे यांनी कार्यक्रम सादर केला घेतला. जळगाव शहरातील महाबळ येथे हेमंत क्लासेस कार्यरत आहेत.
या क्लासेसचे संस्थापक आणि संचालक हेमंत पाटील यांनी या कार्यक्रमासाठी महा अंनिसला निमंत्रण दिलेले होते. या अंतर्गत जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष मिथुन ढिवरे यांनी कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते. हेमंत क्लासेस दरवर्षी सात दिवसांचा ज्ञानोत्सव सप्ताह राबवित असतो. सहाव्या दिवशी महा अंनिस तर्फे कार्यक्रम झाला.
अनेक प्रयोग दाखवून त्यामागील सांगितले वैज्ञानिक कारण
या कार्यक्रमांमध्ये मिथुन ढिवरे यांनी हवेतून चैन काढणे, खाली तांब्यांमधून पाणी काढणे, मंत्राने अग्नी पेटवणे, नारळातील भूतबाधा काढणे आणि पाण्यावर दिवा पेटवणे असे अनेक प्रयोग दाखविले आणि त्यामागील वैज्ञानिक कारण सुद्धा स्पष्टीकरण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत कुमार होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला क्लासेस मधील सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.




