जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्यसामाजिक
यावल नगर परिषद ; १२ प्रभाग महिलांसाठी तर ११ प्रभाग पुरुषांकरिता राखीव

यावल (प्रतिनिधी) : नगर परिषदच्या २३ प्रभागाच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत नगर परिषदच्या सभागृहात प्रांत अधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत गवई व नगररचना विभागाच्या नुपूर फालक, पाणी पुरवठा विभागाच्या अनुराधा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यात १२ प्रभाग महिलांसाठी तर ११ प्रभाग पुरुषांकरिता राखीव करण्यात आले.
प्रभागनिहाय आरक्षण असे
- प्रभाग क्रमांक १ – अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक २ – अनुसुचित जाती व सर्वसाधारण महीला,
- प्रभाग क्रमांक ३ – ना.म .प्र. महीला व सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ४ – अनुसुचित जाती महिला व सर्व साधारण
- प्रभाग क्रमांक ५ – ना.म.प्र.व सर्व साधारण महिला
- प्रभाग क्रमांक ६ – ना .म . प्र . महिला व सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ७ – ना.म .प्र. महिला व साधारण
- प्रभाग क्रमांक ८ – सर्व साधारण महिला व सर्वसाधारण साठी राखीव
- प्रभाग क्रमांक ९ – सर्वसाधारण महीला व सर्वसाधारण
- प्रभाग १० – ना.म. प्र. व सर्वसाधारण महीला
- प्रभाग क्रमांक ११ – अनुसुचित जमाती महिला व ना.म.प्र.आणि सर्वसाधारण महीला करीता आरक्षीत
यावल नगर परिषदच्या सभागृहात फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावल नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आले. यात यावल नगर परिषदच्या २३ प्रभागांचे आरक्षण काढून जाहीर करण्यात आले.




