पिस्तूल कमरेला लावून पैशाची उधळण करणे पडले महागात!

व्हिव्हिओ व्हायरल होताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ‘पद्मालय पोलीस हॉल’, पोलीस मुख्यालय येथे सोमवारी एका कार्यक्रमात पियुष मन्यार याने नागरिकांमध्ये दहशत व्हावी या हेतूने पिस्टल कमरेला लावून पैश्यांची उधळन केली. याचा व्हिव्हिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ‘पद्मालय पोलीस हॉल’ पोलीस मुख्यालय येथे सोमवार, २० रोजी सायकांळी ६ ते रात्री १० यावेळेत खान्देश टाईम्य न्युज, महा पुलीस न्यूज व जळगाव मिडीया न्युज आयोजित “दिवाली सुफी नाईट” हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पियुष मन्यार यांना त्यांच्या स्वःरक्षणाकरीता मिळालेली लायसन्स परवाना असलेली पिस्टल कमरेला लावून नागरीकांमध्ये दहशत व्हावी या हेतूने मध्यप्रदेशचे गायक शफीक मस्तान यांच्या अंगावर पैश्यांची ओवाळणी करून पैसे उधळन केली.
या प्रकारचा व्हिव्हिओ २२ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच या प्रकारची बातमी वरून पियुष मन्यार यांचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला २२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोउपनिरी गोपाल देशमुख हे करीत आहेत.




