पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व डॉ. केतकी पाटील यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन व सकल जैन समाजातर्फे जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरांद्वारे जनसामान्यांची सेवा करीत पंतप्रधान मोदींजींना आरोग्यमय शुभेच्छा देण्यात आल्यात. त्यानिमित्त वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व भाजप जळगाव जिल्हा पूर्व च्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी भुसावळ येथे भाजप व तेरापंथ मंडळाद्वारे आयोजित शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून भाजपाद्वारे सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका तथा जळगाव पूर्व च्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी गोदावरी फाऊंडेशनमधील आरोग्य यंत्रणेला सूचित करून १७ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यास सांगितले.
२२० हुन अधिक रक्त पिशव्यांचे संकलन
त्या पार्शवभूमीवर आज जळगाव शहरातील विमानतळ, यावल, नशिराबाद येथे आरोग्य तपासणी तर भुसावळ येथे तेरापंथ व जैन मंदिर येथे तसेच कुऱ्हे पानाचे व कड्गाव याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरातून हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी झाली असून सायंकाळपर्यंत २२० हुन अधिक रक्त पिशव्यांचे संकलन झाले, ज्याचा लाभ अनेक गरजू रुग्णांना होणार आहे.
यांची होती उपस्थिती
भुसावळ विधानसभा क्षेत्रांतर्गत भुसावळ येथील तेरापंथ भवन येथे भाजप व तेरापंथ युवक व महिला मंडळाद्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या भव्य शिबिराचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, जळगाव पूर्वच्या सर चिटणीस डॉ. केतकी पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, ॲड. बोधाराज चौधरी, राजू महाजन, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, माजी प.स. सदस्य गोलू पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जळगाव जनता बँकेचे संचालक जयंतीलाल सुराणा, रवी निमाणी, गौतम चोरडिया, गल्लूदास छाजेड, सतीश साखरे, वरूण इंगळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रशेखर अग्रवाल, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, तेरापंथ महिला व युवक मंडळ, कॉसमॉस बँक अधिकारी, श्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगाव येथील कर्मचारी व भुसावळकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




