आरोग्यजळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक
हमाल बांधव, स्वच्छता कर्मचाऱ्यांना रोटरी क्लबतर्फे मिठाई वितरण

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे रेल्वे स्टेशनवरील हमाल बांधव, स्वच्छता कर्मचारी आणि पांझरापोळ संस्थेतील ६० कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरीचे जेष्ठ सदस्य कवरलाल संघवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, माजी अध्यक्ष अशोक जोशी, योगेश गांधी, ॲड. हेमंत भंगाळे, चंदन महाजन यांच्यासह रेल्वे स्टेशन अधीक्षक कौस्तुभ चौधरी व आरपीएफ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.




