अभिवादनआरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक
कवी अशोक नायगावकर यांचा २६ रोजी मिश्किली आणि कविता कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : येथील आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव आणि व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ला. ना. हायस्कूलच्या गंधे सभागृहात सुप्रसिद्ध कवी विनोदी लेखक व मिश्किली कलाकार अशोक नायगावकर यांचा मिश्किली कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य व प्रवेश खुला आहे. साहित्य, विनोद आणि काव्य यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमास जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. भरत बोरोले यांनी आवाहन केले आहे.




