
भुसावळ, (प्रतिनिधी) : आषाढीएकादशीनिमित्त येथीलडॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तीभावात विठू नामाचा गजर करण्यात आला. हा उपक्रम प्राचार्या अनघा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात घेण्यात आला.
पारंपारिक प्रार्थना, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारसाचे जतन आणि संवर्धन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व आणि आपल्या जीवनात श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व सखोल समजले. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्ये आणि सांस्कृतिक जागरूकता वाढविण्यास मदत झाली.