पाल येथील वृंदावन धाममध्ये वसुबारस उत्सव साजरा

पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : येथील श्री वृंदावन धाम पालस्थित श्री हरी गोपाल गौशाला येथे १७ रोजी वसुबारस (रमा एकादशी) उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील चैतन्य साधक परीवाराचे जेष्ठ साधक बंधुजन, अन्य ग्रांमस्थ मंडली, तरुण बंधुजन, आश्रमस्थित ब्रह्मचारी, माता भगीनी तसेच लहान बाल गोपाळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साधकांनी केले मार्गदर्शन
सर्व साधक परीवारातून प्रत्येकाने एक गौमाता दत्तक घेऊन त्याचे भरण पोषण आहार याची जबाबदारी घ्यांवी, असे आश्रमातील ब्रह्मचारी श्री दिव्य चैतन्यजी महाराज यांनी सुचविले. तसेच नवनीत चैतन्यजी महाराज व शिव चैतन्यजी महाराज यांनी गौ माता बद्दल, गोमूत्र व गौमातेचे गोबर यांचे आयुर्वेद मधील महत्वबद्दल माहिती दिली. श्री उत्तम गुरुजी यांनी आपल्या अनुभवात म्हटले की, जो व्यक्ति गौ मातेच्या पाठीवरुन हात फिरवितो त्याची बीपी सुस्थितित राहते आणि तसेच गावातील व बाहेरून आलेल्या साधकाने आपापले मत व्यक्त केले.
तसेच पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न कसे करावे या बद्दल माहिती पशू वैद्यकिय अधिकारी राधा रासवे यांनी आपले मत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी माजी सरपंच अर्जुन जाधव, उप सरपंच रघुनाथ चव्हाण, अनारसिग गुरुजी, दिनेश जाधव, भिमसिग चव्हाण, प्रदीप जाधव, रवि जाधव, हरि परेमसिग, पिंटू पवार, पुनमचद जाधव, प्रकाश पवार, मदन महाराज, कालु गुरूजी, विकास पवार, शितल बुनकर तसेच आश्रम संचलित सांदीपनी गुरुकुलचे शिक्षकवृद यांनी परिश्रम घेतले. आभार गरुकुलचे मुख्याध्यापक सुनिल राठोड यांनी मानले.




