राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेरच्या विद्यार्थिनीने पटकविले रौप्यपदक

रावेर (प्रतिनिधी) : विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे १४ रोजी संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा-२०२५-२६ पार पडल्या. त्यात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, रावेर शाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी लावण्या निलेश पाटील हिने राज्यस्तरावर रौप्यपदक पटकवून शाळेसह तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
स्वामी विवेकानंद विद्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींने यश संपादन केल्याबद्दल स्वामी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनिषा पवार तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याधापक राजू पवार, मुख्याध्यापिका श्रीमती धांडे, पर्यवेक्षिका श्रीमती निळे यांनी अभिनंदन केले आहे. लावण्या हिला क्रीडाशिक्षक विष्णू चारण, मंगेश महाजन, श्री सपकाळे, श्री मैराळे, जयेश कासार, श्री राऊत, श्रीकृष्ण, श्री जीवन तसेच स्वामी स्पोर्ट्स क्लबचे सर्व आजी- माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.




