क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीय

पेट्राल पंपवर घडलेला सशस्त्र दरोड्याचा गुन्हा उघडकीस

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुद्देमालासह सहाजण ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर व वरणगांव येथील पेट्राल पंपवर घडलेला सशस्त्र दरोड्याचा गुन्हा उघडकीस आला असून यात पोलिसांनी सहा जणांना नाशिक व अकोल्यातून ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून दरोड्यात वापरणाऱ्या साहित्यासह ३ गावठी पिस्टल, ५ मॅगझीन, १० जिवंत काडतुस, ९ मोबाईल फोनसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या महिनीनुसार, बोदवड चौफुली (मुक्ताईनगर) येथील रक्षा टोफ्युअल (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा (मुक्ताईनगर) येथील मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप आणि वरणगाव शिवारातील तळवेल फाटा (भुसावळ) येथील सय्यद पेट्रोल पंप या तीन ठिकाणी ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान पाच ते सहा जण मोटारसायकलवर येऊन बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. यावेळी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक माहितीच्या आधारे पथकांनी अहोरात्र आरोपींचा पाठलाग केला

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील ५ तपास पथकांनी अहोरात्र ४ दिवस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा मुक्ताईनगर ते नाशिक आणि अकोला पर्यंत पाठलाग केला. पथकाने ४ आरोपींना नाशिक येथून, तर १ आरोपी आणि १ विधी संघर्षित बालकाला अकोला येथून ताब्यात घेतले.

पाच आरोपींसह एकाबालकाला घेतले ताब्यात
पोलिसांनी या कारवाईत सचिन अरविंद भालेराव (वय ३५, रा. भुसावळ ह.मु. खकनार, जि. बऱ्हाणपूर-मध्य प्रदेश), पंकज मोहन गायकवाड (वय २३, रा. भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (वय २३, रा. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, रा. अकोला) आणि प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, रा. अकोला) या पाच संशयित आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button