
रावेर (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव अंतर्गत ग्रामपंचायत आंबेहोळ येथे ४ सप्टेंबर रोजी कीटकजन्य आजार वाढू नये यासाठी आरोग्यसेवक नितीन तिरमाळी यांनी डेंग्यू व मलेरिया विषयी जनजागृती करण्यात आली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. विवेक खतगावकर यांच्या आदेशान्वये हा सत्संग कार्यक्रम घेण्यात आला.
उपकेंद्र लोंजे अंतर्गत ग्रामपंचायत आंबेहोळ येथे गावातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि इतर कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी काय काय खबरदारी घ्यावी, या विषयी सत्संग कार्यक्रमात माहिती देऊन आरोग्य शिक्षण देण्यात आले. त्यात कंटेनर सर्व्हेक्षण करताना डेंग्यू व मलेरिया डासाचे जीवनचक्र विषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. सोबत तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे, टाकीला झाकण लावणे किंवा कापड बांधणे, वापरात नसलेले टायर जाळून टाकणे, नारळाच्या करवंट्या जाळून टाकणे व एक दिवस पूर्ण गावातील टाक्या खाली करून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याविषयी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
जनजागृती आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, आरोग्य निरीक्षक किरण बेलदार, वैद्यकीय अधिकारी मनोहर जाधव, आरोग्य सहाय्यक कैलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.
यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणगाव, उपकेंद्र लोंजे येथील आरोग्यसेवक नितीन तिरमाळी, योगेश झांबरे व आशा सेविका यांनी विशेष मेहनत घेतली.




