आंदोलनआरोग्यजळगावताज्या बातम्यापर्यावरणपुरस्कारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत देवगाव येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती

लोकसहभागातून जलसंधारणाचा आदर्श उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी जलसंधारण हा एक महत्त्वपूर्ण घटक असून, त्याअंतर्गत वनराई बंधारे बांधण्याच्या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने पारोळा तालुक्यातील देवगाव येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.

मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी देवगाव ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेची पाहणी केली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील निवडलेल्या साईटवर लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.या प्रसंगी सरपंच, ग्रामस्थ, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम गावकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, भविष्यातील पाणीटंचाई समस्येवर उपाय म्हणून तो प्रभावी ठरेल, असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत “जलसंधारणाचे काम ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक ग्रामस्थाची सामाजिक जबाबदारी आहे. लोकसहभागातून उभारलेले बंधारे अधिक टिकाऊ आणि परिणामकारक ठरतात,” असे प्रतिपादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button