
जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेने महायुती सरकारने पाचवी बहुमताच्या जोरावर जन सुरक्षा कायदा मंजूर केला या कायद्याच्या विरोधात जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसने आज निषेध आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसने महाराष्ट्र सरकारने आपल्या पाचवी बहुमताच्या जोरावर महाराष्ट्र सुरक्षा विधेयक २०२४ हा कायदा मंजूर केला. या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसने आज जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर निषेच्या घोषणा करून या विधेयकाच्या विरोधात आंदोलन केले. हे विधायक जर महाराष्ट्रात लागू झाले तर संविधानातील संविधानिक मूलभूत अधिकाऱ्यांचा आवाज घोटला जाणार आहे. सरकारच्या असवैधानिक चुकीचा ध्येय धोरणाचा जो विरोधी पक्ष, संघटना, न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्या संघटनांचे कार्यकर्त्यांना विना चौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या जलसुरक्षा कायद्याने सरकारला मिळणार आहे.
शिवशाही फुले आंबेडकरवादी संघटना पुरोगामी संघटना, शेतकरी, कामगार, पत्रकार यांच्या संघटना संपण्यासाठी सरकारने या तसेच लोकशाहीचा चौथा समजल्या पत्रकार लेखक यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार हा कायदा आहे. या जुलमी संविधायक कायद्याच्या विरोधात आज जळगाव जिल्हा काँग्रेसने जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनात जिल्हा सेक्रेटरी जमील शेख, हमीद शेख सचिन सोमवंशी, डॉ. जगदीश पाटील, बीके सूर्यवंशी, मनोज पाटील, तुषार संदाशीव, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, ऐश्वर्या राठोड, शरद पाटील, रतिलाल महाजन, दिलीप शेंडे, सुनील पाटील, विजय महाजन आशुतोष पवार आदी उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस च्या आवारात आंदोलन संपल्यावर जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांना निवेदन देण्यात आले.