ताज्या बातम्या

गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरूच ; पिंप्राळ्यात १९ सिलेंडरसह एकाला अटक

जळगावात रामानंद नगर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार सुरूच आहे . पिंप्राळा परिसरातील वीर सावरकर नगरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ. जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, अजय सपकाळे यांच्या पथकाने वीर सावरकर नगरमधील एका घरावर छापा टाकला. या ठिकाणी घरगुती आणि कमर्शियल असे मिळून एकूण १९ गॅस सिलिंडर आढळून आले. यामध्ये भारत गॅसचे एक भरलेले घरगुती सिलिंडर, ८ भरलेले कमर्शियल सिलिंडर आणि १० रिकामे कमर्शियल सिलिंडर यांचा समावेश होता. तसेच दोन वजनकाटे व एक रेग्युलेटरही जप्त करण्यात आला. वसीम चंगा शाह ( २८) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विनोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button