
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाऊंडेशन्सच्या डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात एआय इन एज्युकेशन हाऊ स्टुडंट्स कॅन युज एआय टूल्स या विषयावर चर्चासत्र उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज, जळगावचे आयटी डीएस विभागप्रमुख डॉ. निलेश वसंत इंगळे यांच्या सोबत विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ नयना महाजन उपस्थीत होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.डॉ. निलेश इंगळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात एआय साधनांचा योग्य, सुरक्षित आणि प्रभावी वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. एआयद्वारे उपलब्ध असलेल्या संधी, अभ्यासातील उपयोग, प्रामाणिकपणाचे महत्त्व तसेच भविष्यातील करिअर दिशा यांवर त्यांनी प्रकाश टाकला.
समन्वयक ग्रंथपाल डॉ. ईश्वर सुभाष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन व स्वागतपर भाषण (बी.ए. एल.एल.बी. प्रथम वर्ष) देवशी साराफ हिने केले, तर आभार(बी.ए. एल.एल.बी. तृतीय वर्ष) ऋतुजा भिडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




