
जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य आणि धार्मिक यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शिवकमल संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी मान्यवरांकडून विविध प्रकारच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून प्रस्ताव मागविन्यात आले आहे.
या पुरस्काराचे वितरण नंदुरबार व जळगाव येथील अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. हे प्रस्ताव ३० ऑगस्टपर्यंत शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था, C/o अमोल गोविंदा महाजन, उत्राण ता.एरंडोल जि.जळगाव या पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रस्तावासोबत शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया एरंडोल शाखा येथे देय असलेला ११०० (अकराशे रुपये) नामांकन फी असलेला डिमांड ड्राफ्ट (DD) जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारसाठी निवड झालेल्या मान्यवरांना निवड पत्र द्वारे कळविण्यात येईल. ज्यांची पुरस्कारासाठी निवड होणार नाही त्यांना त्यांनी दिलेले नामांकन शुल्क परत केले जाईल, असे संस्थेमार्फत कळविले आहे.




