अभिवादनआरोग्यक्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिकसामाजिक

महिला क्रीडा स्पर्धेचा समारोप : सांगली, अकलूज, विलेपार्ले महाविद्यालयाचे संघ प्रथम विजेते

एसएनडीटी विद्यापीठ, डॉ. वर्षा पाटील महाविद्यालयातर्फे आयोजित स्पर्धेचा समारोप

जळगाव (प्रतिनिधी) : एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राज्यस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेत सांगलीच्या सी. बी. शाह महाविद्यालयाने व्हॉलीबॉल, ऍथलेटिक्स या दोन्ही क्रीडाप्रकार स्पर्धेत प्रथम तर तायक्वांदो स्पर्धेत विलेपार्ले येथील मणिबेन महाविद्यालयाने तर रस्सीखेच स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथिल एसएनडीटी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकावर यश मिळविले.

पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एसएनडीटी विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य एस. डी. चौधरी, गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. वैभव पाटील, जैन इरिगेशनचे निवृत्त अधिकारी संजय चौधरी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ.प्रशांत वारके यावेळी मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला प्रस्तावनेतून आयोजक म्हणून डॉ.प्रशांत वारके यांनी आयोजनाबाबतचा आढावा घेतला. तर स्पर्धेबाबत एकंदर सारांश क्रीडा संचालिका कविता खोलगडे यांनी मांडला.

यावेळी एस. डी. चौधरी यांनी, अपयश आल्यावर नाउमेद न होता सातत्याने यशासाठी प्रयत्न करीत राहावे असे सांगून विद्यार्थी खेळाडूंच्या स्पर्धेतील उत्तम सादरीकरणाबाबत कौतुक केले. यावेळी विद्यार्थिनींमधून नागपूर येथील हरिबा शेख, अपर्णा पाटील आणि जुहू येथील शुभ्रा पोतदार यांनी तर प्रशिक्षकांमधून सांगलीच्या प्रा. दीपक राऊत यांनी मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट आयोजनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या की, मैदानी खेळामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होतो. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खेळासाठी रोज किमान एक तास देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामकाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न महाविद्यालयातूनच होतात, असेहि प्रतिपादन डॉ. वर्षा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगिता घोंगडे यांनी करून आभार व्यक्त केले. स्पर्धेसाठी डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनसह गोदावरी फाउंडेशनच्या विविध कर्मचारी, अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

व्हॉलीबॉल स्पर्धा : प्रथम – सी. बी. शाह महाविद्यालय, सांगली, द्वितीय : शहा महा., मालाड, तृतीय : उमांगीताई महा., नागपूर. * इमर्जिंग खेळाडू : हरिबा शेख, नागपूर, प्रॉमिसिंग खेळाडू : नंदिता पांडे, मालाड, उत्कृष्ट खेळाडू : अक्षदा वाबळे, सांगली. वैयक्तिक उत्तेजनार्थ : देविका पिल्ले, मुंबई व साक्षी माळी, सांगली.

ऍथलेटिक्स : प्रथम – सी. बी. शाह महाविद्यालय, सांगली, द्वितीय : जाधव महा. वज्रेश्वरी, मुंबई, तृतीय : महिला महा., माटुंगा.

तायक्वांदो : प्रथम – मणिबेन कॉलेज, विलेपार्ले, द्वितीय : पी. एन. महा., घाटकोपर, तृतीय : एसएनडीटी महा. चर्चगेट. इमर्जिंग खेळाडू : गौरी कांबळे, चर्चगेट, प्रॉमिसिंग खेळाडू : अनुष्का परदेशी, जुहू, उत्कृष्ट खेळाडू : स्वीटी ढमढेरे, पुणे.

रस्सीखेच : प्रथम – एसआरएनटी महाविद्यालय, अकलूज, द्वितीय : शहा महा., मालाड, तृतीय :सी. बी.शहा महा., सांगली. उत्तेजनार्थ : डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालय, जळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button