पाल येथे घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाल, ता.रावेर (प्रतिनिधी) : पाल हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. मात्र याठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून रस्ता व गटारीची साफ सफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडे घातले आहे.
पाल या गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये गेल्या २ ते ३ वर्षांपासून रस्त्यावरील नियमित रस्तासफाई होत नाही. तसेच येथील गटारी खाणीने तुंबलेल्या असून त्याकडे ग्राम पंचायत काना डोळा करत आहे. या वार्डात घरकुल योजना जाहीर केलेल्या असून येथील रहिवाशांचे आरोग्य घोक्यात आहे. येथे प. पूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या जन्म स्थळापासून ते ग्राम पंचायत उपसरपंच यांच्या घरापर्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. याबाबत वारंवार सुचना देऊन सुद्धा येथील साफसफाई केली जात नाही.
येथील नागरिकांच्या घरातील सांडपाणी काढण्यासाठी ग्राम पंचायत, पंचायत समितीच्या काही योजना सुरू करण्यात आहेत. त्याद्वारे शोष् खड्डे बनविण्यात येणार होते. मात्र, गावातील काही नागरिक विनाकारण विरोध दर्शवत असुन ग्राम पंचायत काहीही दखल न घेता खोदलेले खड्डे परत बुजविण्याचे काम करत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यामुळे लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून येथील रहीवासीस न्याय मिळावा, यासाठी येथील नागरिकांनी विशेष कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी, फैजपुर, महसूल अधिकारी व तहसिलदार, रावेर, जिल्हाधिकारी कार्यालयात, जळगाव आणि नाशिक आयुक्त कार्यालयात दाद मागितली आहे.




