जळगाव जिल्हा पोलिस दल पोलिस स्पोर्ट्स कराटे, स्केटिंगच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : क्रीडा व युवकसेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यात नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या विभागीय वूशू स्पर्धेमध्ये पोलिस क्लास मधील कराटे खेळाडू मनस्वी तायडे सुवर्णपदक घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग तिसऱ्या वर्षी आपले पद निश्चित केलेले आहे.
९ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान संभाजीनगर गोवरखेडा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये मनस्वीची निवड झालेली आहे. शालेय कराटे व स्केटिंग स्पर्धे मधे देखील विभागीय क्रीडा स्पर्धे साठी पुढील खेळाडू यांची निवड झाली आहे.
विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
कौस्तुभ जंजाळे, कार्तिक शिंदे , महेश वाघ, श्रेयस परदेशी , कुणाल बाविस्कर , नितीश भोसले, संकेत पवार, अदिती खंगार, आराध्या तोडा, नेहा आहिरराव, मानसी सूर्यवंशी, निशू कोळी प्राची पाटील, मानवी पाटील, साक्षी बाविस्कर , प्रांशी सोनवणे, मनस्वी तायडे यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
स्केटिंग – कार्तिक चौगले, कौस्तुभ चौगले, श्रवण महाले ,मानसी चौधरी ,तेजल सूर्यवंशी, मानसी सूर्यवंशी यांची पुढील विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
सर्व विजय खेळाडू यांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उप अधीक्षक अरुण आव्हाड, नितीन गणापुरे पोलिस उपविभागीय अधिकारी जळगाव भाग, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी खेळाडूंना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडू यांना प्रशिक्षक म्हणून अश्विनी निकम, जागृती काळे,राजेंद्र जंजाळे ,स्वप्नील निकम,प्राजक्ता सोनवणे ,प्रथमेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.




