शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी योगीराज पाटील यांची नियुक्ती!

रावेर तालुक्याला प्रथमच मिळाला मान
रावेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघातून रावेर, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाप्रमुखपदी रावेर तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील (रा.मोरगाव, ता. रावेर) यांना पदोन्नती देऊन जिल्हाप्रमुख पदाचा मान मिळाला आहे.
योगीराज पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपेविण्यात आली आहे. रावेर तालुक्याला जिल्हाप्रमुख म्हणून प्रथमच संधी प्राप्त झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एक वेगळे नवचैतन्य शिवसेना पक्षातर्फे दिसून येईल. पक्षाने योगीराज पाटील यांची निष्ठा व धडाडीचे कार्य लक्षात घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुखाची जबाबदारी देऊन योग्य निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.




