
धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : प्राचीन भारतीय संस्कृतीतील आद्यकवी म्हणून ओळखले जाणारे रामायण रचिते महर्षी वाल्मिकी यांची जयंती धामोडी गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात ज्येष्ठ मंडळी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणातून महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातील आदर्श, रामायणाच्या निर्मितीतले त्यांचे योगदान आणि समाजसुधारणेतील त्यांची भूमिका याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या जयंतीनिमित्त समाजातील तरुणांनी एकतेचा आणि सद्भावनेचा संदेश देत “जय वाल्मिकी”च्या घोषणा दिल्या.



