क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसामाजिक

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी

तब्बल १० देशी कट्टे, २४ जिवंत काडतुसे जप्त; पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, जळगाव जिल्हा पोलीस दलाने १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान अवैध अग्नीशस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम यशस्वीपणे राबवली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्तरीत्या कारवाई करत एकूण १० देशी बनावटीचे कट्टे आणि २४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलांचा समावेश असून, काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे. ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव कविता नेरकर आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे यशस्वी केली. जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा जिल्हा पोलिसांनी दिला आहे.

यांच्यावर झाली कारवाई
या कारवाईत अटक झालेल्या अनेक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यात पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान निकम याच्यावर आधीच ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, जळगाव शहरातील गुन्ह्यातील आरोपी युनूस पटेल याच्यावर २ तर विठ्ठल भोळे याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी वेळेत ही शस्त्रे जप्त केल्याने आगामी काळात घडणारे अनेक मोठे गुन्हे टळले आहेत, असे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button