आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यासमस्या

सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कारागीराला अटक

१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश; ७ पर्यंत पोलीस कस्टडी

जळगाव (प्रतिनिधी) : सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कारागीराला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. बिस्वजीत बनेस्वर सासमल (सोने कारागीर, हमु रिधुरवाडा, मुळ रा. वार्ड नं. १० जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आले असून त्याला ७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी पेठ येथील निखिल कैलास गौड (वय 30, व्यवसाय सोने कारागीरी) यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्सचे दुकान आहे. त्याठिकाणी बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. वार्ड नं. 10, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याने ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३० ते ४.१२ वाजेच्या दरम्यान दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातून १२४ ग्रॅम सोन्याची चोरी केली होती म्हणून त्याचेविरुध्द शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड
गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून आरोपीताची खात्री केली. तसेच आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याची पत्नी हैद्राबाद येथे राहण्यास असल्याने ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हैदराबाद येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केल्याचे तात्रिक विश्लेषणावरून निष्पन्न झाले. त्यानुसार तात्रींक माहितीवरून आरोपीचे शोध कामी लावलेला सापळा यशस्वी होवून ४ ऑक्टोबर रोजी संशयित आरोपी बिस्वजीत बनेस्वर सासमल यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. त्याला न्यायालयात हजर करुन त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली.

जप्त केले मुद्देमाल असा
चोरी करण्यासाठी वापरलेल्या साधनाबाबत विचारपूस करता त्याने खालील मुद्देमाल काढून दिलेला आहेत.

  • एकूण 13,99,000/-रुपये किमतीचे 124.06 ग्रॅम वजनाचे सोने (100% मुद्देमाल हस्तगत)
  • एक 18 इंच लांबीची कात्री (कटावणी)
  • एक लोखंडी पेन्विस (पक्कड)
  • एक एक्झाब्लेड असे चोरी करण्यासाठीचे साधने

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक शोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.कावेरी कमलाकर, तसेच API साजिद मंसूरी, PSI योगेश ढिकले, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोहेकॉ प्रदिप नन्नावरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोकॉ योगेश साबळे, पोकों निलेश घुगे, पोकॉ अमोल वंजारी, पोकों नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोकॉ गौरव पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button