क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतूससह तरुण ताब्यात

जळगाव शहर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खानदेश सेंट्रल परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांनी संशयित आरोपीकडून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला असून याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना बुधवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातील खानदेश सेंट्रलकडे जाणाऱ्या रोडवर एका संशयित आरोपी हा जवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश आव्हाड, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ सतीश पाटील, उमेश भांडारकर, योगेश पाटील, दिपक शिरसाठ, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, भगवान पाटील, पोलीस नाईक भगवान मोरे, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि राहूल पांचाळ या पथकाने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली.

त्यांची चौकशी केली असता हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) असे नाव सांगितले. पोलीसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल अशोक ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दीपक सुरवळकर करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button